ताज्याघडामोडी

जादूटोण्याचा संशय, चेटकीण समजून जमावानं जिवंत जाळलं; पती आणि मुलांसमोर महिलेनं सोडला जीव

देशाला हादरून सोडणारी एक घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या संशयातून सहा जणांच्या टोळक्यानं एका महिलेवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. त्यानंतर तिला जिंवत जाळण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातल्या बहबरी परिसरात घडली आहे. सोनितपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मधुरिमा दास यांनी या घटनेबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन जण फरार आहेत. यातील तीन जणांना 24 डिसेंबरला रात्री अटक करण्यात आली तर एकाला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तेजपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार संगीता कपि असं मृत पीडित महिलेचं नाव आहे. संगीता ही तीन मुलांची आई होती. ती जादूटोणा करते असा संशय शेजाऱ्यांना होता. याच संशयातून हे हत्याकांड घडलं आहे. सहा जणांच्या टोळक्यानं तिच्यावर आधी धारदार शस्त्रानं हल्ला कोला अन् नंतर तिला जिवंत जाळण्यात आलं. या घटनेबाबत माहिती देताना पीडितेच्या पतीनं सांगितलं की, हल्लेखोरांना संगीता ही चेटकीण असल्याचं संशय होता, तसेच ती जादूटोणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याच संशयातून त्यांनी तिच्यावर हल्ला केला, व त्यानंतर तिला जिवंत जाळण्यात आलं. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago