ताज्याघडामोडी

भाजीवरून बायकोसोबत वाद; आईच्या मध्यस्थीने मुलगा संतापला, अन् नको ते करून बसला

मोर्शी मुलगा आणि सुनेच्या भांडणात आई मध्यस्थी करायला गेली. त्यावेळी मुलाने रागाच्या भरात आईच्याच छातीत लोखंडी सळाख भोसकून तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना शहरातील गाडगेनगर परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीताकौर रमेशसिंग बावरी (५०) रा. गाडगेनगर असे मृतक तर नरसिंग रमेशसिंग बावरी (३५) रा. गाडगेनगर असे आरोपीचे नाव आहे. नरसिंग हा पत्नी रजनी (२८) यांना नेहमी मद्यप्राशन करून छोट्या-मोठ्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण करत होता. आल्यावर जेवणातील भाजीच्या कारणावरून पत्नी रजनी यांच्यासोबत वाद घातला. या वादात त्याने रजनी यांना मारहाण केली. इतकेच नव्हे, तर घरातील लोखंडी सळाख हातात घेऊन तुला आज मारूनच टाकतो, असे म्हणत तो त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यामुळे त्याची आई सीताकौर ह्या भांडणात मध्यस्थी करायला गेल्या.

त्यावर नरसिंगने आई सीताकौर यांच्या छातीत लोखंडी सळाख भोसकून त्यांची हत्या केली. ही बाब शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यावर सीताकौर यांना रक्तबंबाळ अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रजनी यांनी मोर्शी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नरसिंगविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल रणखांब करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago