ताज्याघडामोडी

बर्थडेला केक कट केला अन् रात्री आयुष्य संपवलं, मावशी म्हणते – आईच्या प्रियकराने हत्या केली

एका १५ वर्षांच्या मुलीने आपल्या वाढदिवशी मैत्रिणींसोबत शाळेत मौजमजा केली. घरी येऊन केक कट केला आणि त्यानंतर तिने रात्री गळफास घेत आपलं आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बिहारमधील गोपालगंज येथे ही घटना घडली. याप्रकरणी नातेवाईकांवर आईच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. तर, संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाला आहे. सध्या पोलिस त्याचा तपास घेत आहेत.

गोपालगंज येथे राहणारी ही अल्पवयीन मुलगी ९ व्या वर्घात शिकत होती. तिने तिच्या वाढदिवशीच इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.मृत मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या आईच्या प्रियकर पंकज कुमारवर मुलीची हत्या करून तिला फासावर लटकवल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक पुरावे जप्त केले असून, त्याआधारे मृत्यूचे गूढ उकलण्याचा तपास सुरू आहे.

बुधवारी (२५ ऑक्टोबर) विद्यार्थिनीचा वाढदिवस होता. शाळेत तिने तिच्या मैत्रिणींना मिठाई खाऊ घातली आणि घरी आल्यावर तिने केक कापला. सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र अचानक विद्यार्थिनीने रात्री गळफास का लावून घेतला याचं गूढ सध्या उलगडलेलं नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

15 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago