ताज्याघडामोडी

विवाहीत पुतणी दुसऱ्या तरूणाशी बोलताना दिसली, त्यानंतर काकाने जे केलं त्यामुळे…

अहमदनगरच्या कोपरगाव येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेथे एका विवाही तरूणीची तिच्या काकानेच हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. माहेरी आलेली ही तरूणी घराबाहेर एका मुलाशी बोलत होती, हे पाहून काका संतापला आणि त्याच भरात त्याने हे कृत्य केल्याचमे समजते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपी काकाला ताब्यात घेत अटक केली आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारासा घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण गाव हादरलं. मृत तरूणीच्या आईने पोलिसांत धाव घेत रडतरडत सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपीच्या संतोष आरणे ( वय २६) मुसक्या आवळल्या. त्याची पुढील चौकशी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागात हा दुर्दैवी प्रकार घडला. तेथे बुधवारी रात्री १२ च्या सुमारास काकाने हल्ला केल्या ज्यामध्ये पुतणीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यांच्या सांगण्यानुसार, नेहा ही त्यांची २१ वर्षीय विवाहीत मुलगी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी रहात होती. बुधवारी रात्री ती घराबाहेर येऊन एका तरूणाशी बोलत होती. तेवढ्यात तिचा काका संतोष आरणे याने हे दृश्य पाहिले. त्याला तिच्यावर संशय आला, तो संतापला आणि रागाच्या भरात तो कुऱ्हाड घेऊन आला. त्याने नेहाच्या दोन्ही पायांवर धारदार कुऱ्हाडीने वार करून तिला जबर जखमी केले.

हे पाहून कुटुंबियांनी तिला उपचारासांठी तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बराच रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

15 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago