ताज्याघडामोडी

मित्रच बनला वैरी! 60 रुपयांसाठी मित्राची गळा दाबून हत्या

राज्यात रोज हत्येच्या घटना समोर येत राहतात. आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असलेल्या अनेक लहान गोष्टी किती मोठ्या घटनेचं स्वरूप घेऊ शकतात, याचे ज्वलंत उदाहरण आता समोर आलं आहे. यात दोन मित्र आपसात बसून पैशाच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा करत होते. मात्र याच कारणावरुन वाद झाला आणि शेवटी एकाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम बोदा येथे घडली.

आरोपी अल्पेश कुवरलाल पटेल याने मृतक आकाश लक्ष्मण दानवे (वय 21) वर्ष याला उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली. यानंतर मृतक तरुणाने सांगितलं, की पैसे सायंकाळी फोन पेने पाठवतो. त्यावर आरोपीला विश्वास बसला नाही, त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका वाढला की आरोपीने आकाश लक्ष्मण दानवे गळा आवळला. त्यात आकाश हा बेशुद्ध होऊन खाली कोसळला.

त्यानंतर लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आलं. तिथून त्याला पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आलं. परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आकाशला मृत घोषित केलं. ही घटना बोदा या गावात घडली. दवनीवाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृत तरुणाचं शव विच्छेदन उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे बोदा या गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपीला दवनीवाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…

2 minutes ago

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

3 weeks ago

१९ एप्रिल रोजी शिवस्वराज्य पंढरीरत्न राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या…

4 weeks ago

मा.आ.प्रशांत परिचारक यांना विधान परिषद नाही तर विधानसभेचे आमदार करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ आग्रही ?

सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी राम सातपुते,बाळराजे पाटील यांचे नाव आघाडीवर  परिचारक यांनी तिरंगी लढतीत दोन पराभव…

1 month ago

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग…

1 month ago