ताज्याघडामोडी

पंढरपुर महसूल प्रशासनाची अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई

अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील इसबावी, गुरसाळे तसेच शेगांव दुमाला, चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी कारवाई करुन अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे तीन वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध  वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी  विविध 17 पथकांची  नेमणूक केली आहे.

गुरसाळे येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी महिंद्रा पिकअप, इसबावी हद्दीतील  पंढरपूर न.पा पाणी पुरवठा योजना येथे 1ऑक्टोबर रोजी अशोक लेलॅड , शेगांव दुमाला येथे दिनांक 2 ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. तसेच चंद्रभागा वाळवंट रेल्वे गेट जवळ दीड ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून तो साठा शासकीय धान्य गोदाम येथे ठेवण्यात आला आहे.

 पथकात अपर तहसलिदार तुषार शिंदे, मंडळ अधिकारी रिगन चव्हाण, विजय शिवशरण, बाळासाहेब कदम, बाळासाहेब मोरे, अव्वल कारकुन बी.टी. फंड, जे. एम कुंभार, तलाठी प्रशांत शिंदे, अझर पठाण, प्रमोद खंडागळे, समाधान शिंदे, राहुल गुटाळ,मूसाक काझी, कोतवाल कृष्णा इंगळे सहभागी होते.   

                                  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago