ताज्याघडामोडी

गवंडी कामाचे पैसे अडकले होते; मजुरी मागण्यासाठी गेला, मालकाला आला राग, अन् चौघांनी घडवलं धक्कादायक कृत्य

गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी एका मजुराला लाथा बुक्क्यांनी, दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील येसगाव गाव येथील कमानीजवळ घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपक दादा गांगुर्डे (४०) असे मयत मजुराचे नाव आहे. दरम्यान घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दिपक गांगुर्डे यास ग्रामीण रूग्णालय येथे पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. दरम्यान दिपकची पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यात म्हटले आहे की, येसगाव तालुका कोपरगाव येथील दीपक दादा गांगुर्डे (४०) मजुरी (गवंडी काम) याचे आरोपी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, राज उर्फ बबलू सुनील पोळ, अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड यांना गवंडी कामाचे मजुरीचे राहिलेले पैसे मागितले. या कारणावरून आरोपींना त्याचा राग आला. त्यानंतर तिघांनी शिवीगाळ करून आणि लाथा बुक्क्याने दगडाने मारहाण करून आरोपी अण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड याने त्याचे हातातील लाकडी दांड्याने दिपकच्या डोक्यात तसेच शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण केली. यात जबर जखमी करून त्याचा खून केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago