राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे राज्यातल्या बहुतांश भागांत महिन्याभरात पाऊस असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यात इतरत्र पाऊस होणार असून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर एका जिल्ह्यात मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, ठाणे, पुणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरीत मात्र पावसाचा ऑरेंज असणार आहे. यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत बाहेर पडावं तर शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज घेत शेतीच्या कामांना सुरुवात करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…