Categories: Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेजमधील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत वर्चस्व
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे.सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स सोरेगाव पोलिस कॅम्पस सोलापूर येथे स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 16 वर्ष वयोगटात कु.सलोनी प्रवीण गुंगे हिने लांबउडीत द्वितीय क्रमांक मिळविला तर कु.अशिष नवनाथ जगताप याने हॅमर थ्रो मध्ये प्रथम क्रमांक मिळविला व कु.रूद्राक्ष मुरलीधर शिंदे याने  हॅमर थ्रो मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला 18 वर्ष वयोगटात कु.ऋतुजा आनंद पवार हिने हॅमर थ्रो मध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर कु.अपूर्वा यलमार‌ ने हॅमर थ्रो मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर व कॅम्पस डायरेक्टर डॉ श्री संजय अदाटे, प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार  केला. राज्यस्तरीय विद्यार्थ्यांची निवडीबद्दल अभिनंदन केले.मार्गदर्शक शिक्षक श्री पंचाक्षरी स्वामी यांचेही  अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.किरण कोडग यांनी केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago