ताज्याघडामोडी

हसतं खेळतं कुटुंब पहाटेच्या भांडणामुळं संपलं, आईला पाहून लेकरांना धक्का, वडिलांना शोधलं अन्…

घरचे सर्वजण झोपेत असताना भल्या पहाटे पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो वाद एवढा विकोपाला गेला की चक्क पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घातला. यामुळे वर्मी घाव बसल्याने ती रक्तबंबाळ होऊन कोसळली. हे पाहून पतीने पळ काढला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान पत्नीचा नागपूर येथे मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सेलोटी गावात घडली आहे. मृतक पत्नीचे नाव भारती भारत चाचेरे (४०) असून पतीचे नाव भारत चाचेरे (४४) असे आहे. त्यानंतर आरोपी पतीने सुद्धा सेलोटी गावाजवळील नहरात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मृतक भारती आणि भारत या दोघा पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद सुरूच असायचा. मात्र मंगळवारला पहाटेच्या सुमारास या दोघांमध्ये वाद झाला. या वादात मृतक भारती ही स्वयंपाक घरात गेली. तिच्या पाठोपाठ जात पतीने घरात पडलेला लाकडी पाटाचा जोरदार प्रहार तिच्या डोक्यावर केला. यामुळे ती गंभीरित्या जखमी होऊन रक्ताच्या चारोळ्या बेशुद्ध अवस्थेत पडली.

यानंतर भारतने तेथून पळ काढला. दरम्यान मुले झोपेतून उठली तेव्हा त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत स्वयंपाक घरात पडलेली दिसली. मुलांनी आरडाओरड सुरू केली. लगेच घराजवळील मंडळी आली आणि मृतक भारतीला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र नागपूर येथे उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. आपल्या आईच्या हत्येची तक्रार १६ वर्षीय मुलगी खुशी हिने लाखनी पोलिसांनी दिली. लाखनी पोलिसांनी मृतक भारत हा फरार असल्याने त्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतने गावाजवळील एका नहारात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago