गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वरुणराजाचं पुनरागन झालं आहे. मराठवाडा, कोकण, मुंबई आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता विदर्भ, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर आता मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि गोव्यातील पणजीसह घाटमाथ्यावरील तुरळक ठिकाणी येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, मनमाड तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या परिसरात ढगांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता येत्या ४८ तासांत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…