अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी कारवाई करुन अवैध वाळू उपसा व वाहतूक करताना साडेसहा ब्रास वाळू तसेच टिपर, ट्रॅक्टर- ट्रॉली, पिकअप यावर कारवाई केली असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी पथकाची नेमणूक केली आहे.
पंढरपूर शहराजवळील कर्मयोगी शाळेजवळ टीपर पकडून 4 ब्रास वाळू जप्त केली. तसेच पंढरपूरातील कुंभार गल्लीच्या सिमेंट रस्त्याला बिगर नंबरचा लेलँड पिकअप टेम्पो दीड ब्रास वाळूसह वाहतूक करत असताना पकडला त्याचबरोबर शेगाव दुमाला येथे एक ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर- ट्रॉली वर कारवाई करण्यात आली.
सदर वाहनांवर तसेच संबधितांवर गौण खनिज अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार बेल्हेकर यांनी दिली. या पथकात नायब तहसलिदार पी.के. कोळी, वैभव बुचके, मंडलाधिकारी रिंगण चव्हाण, महसूल सहाय्यक राजू शिंदे, तलाठी समाधान शिंदे, दत्ता कोळेकर,राहुल गुटाळ,शिपाई भाऊ शिंदे, वाहन चालक रमेश जाधव सहभागी होते.
५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…