ताज्याघडामोडी

नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा डोळा; प्रियकराच्या मदतीने साधला डाव, पण एका चुकीने फसली

‘घर का भेदी लंका ढाये’, या म्हणीला खरं ठरवत नागपुरातील एका विवाहित महिलेने प्रियकराला टीप देऊन स्वतःच्या घरात 14 लाखाची चोरी करवून घेतली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता या पत्नीला तुरुंगाची हवा खावी लागत आहे.

नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सुमित यादव यांच्याकडे चोरी झाली. यात सोन्याच्या चांदीच्या दागिन्यासह जवळपास 14 लाखांचा मुद्देमाल चोरी गेला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करत घरातील सगळे सीसीटीव्ही तपासले आणि हळूहळू चोरीचा गूढ उलगडत गेलं.

पोलिसांना सुरूवातीपासूनच फिर्यादीच्या पत्नीवर संशय वाटत होता. मात्र, त्यांना पुरावा मिळत नव्हता. पोलिसांनी घटनेचा बारीक तपास केला. तेव्हा पुढे आलं की घटनेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला बाहेर घेऊन गेली.

प्लाननुसार चोराला म्हणजे पत्नीच्या आधीच्या प्रियकराला त्याला घरात कुठे काय ठेवलं आहे, त्याची सगळी माहिती दिली होती. प्लाननुसार हे दोघे बाहेर जाताच तो घरात शिरला आणि काही वेळात ठरल्याप्रमाणे त्याने सगळं मुद्देमाल घेऊन लंपास झाला.

मात्र, सीसीटीव्हीमध्ये तो छत्री घेऊन जाताना दिसला. त्यावरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर रामटेक तालुक्यातील त्याच्या घरी पोहचले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता सोन्या-चांदीचे दागिने आढळले. मात्र या महिलेचा प्रियकर रोख पैसे घेऊन पळण्यात आरोपी यशस्वी झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago