ताज्याघडामोडी

तीन महिन्यापूर्वी लग्न, घरात कुणी नसताना टोकाचा निर्णय

जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन अमरसिंग पवार (वय ३० रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असं मयत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन पवार हा तरूण जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. बांधकाम मिस्तरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी २ वाजता घरातील सर्वजण कामाला निघून गेले होते. पवनची आई दुर्गाबाई या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे पवन हा घरात एकटाच होता. त्याने राहत्या घराच्या मधल्या खोलीत दोरीने गळफास घेऊ-न आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.

दरम्यान, त्याची आई घरात परत आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरूणांनी धाव घेत त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती पवनला मयत घोषीत केलं.

पवन पवार याचा विवाह तीन महिन्यापुर्वीच झालेला होता. त्याच्या पश्चात घरात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी आणि वहिनी असा परिवार होता.घरात सर्व एकत्र कुटुंब आणि सर्व काही सुरळीत असताना पवनने अचानक टोकाचा निर्णय का घेतला? हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago