नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादादरम्यान थेट गावठी कट्ट्याने फायरिंग करण्यात आली आली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मलगावचा पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. सकाळी शेतात कामानिमित्त सर्व खर्डे परिवार शेतात गेले होते. या खर्डे परिवारात शेताच्या बांधावरून नेहमी छोटे मोठे वाद होत असत. नेहमीच होणाऱ्या वादामुळे आज या परिवारात हाणामारी झाली.
गणेश खर्डे यांच्याकडे आलेल्या पाहुण्याने (संशयिताचे नाव माहित नाही) मलगाव येथील २४ वर्षीय अविनाश सुकराम खर्डे या अविवाहित तरुणावर बंदुकीने फायरिंग केल्याचे बोलले जात आहे. यात अविनाश खर्डे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना तात्काळ खाजगी गाडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये असलेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेत सुकराम खर्डे आणि अविनाश खर्डे या दोघांचा मृत्यू झाला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…