देशातील पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवलेला आहे. यामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. महाराष्ट्रात देखील दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसापासून पुन्हा एकदा चांगली हजेरी लावलेली आहे.
पण तरीसुद्धा अद्यापही महाराष्ट्रातील असे काही जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी शेतकरी राजा हा चातकाप्रमाणे पावसाची वाट त आहे. जुलै महिन्याचा शेवट जवळ येत असला तरी अद्यापही म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. परंतु मुंबईसह मुंबई उपनगरात, ठाणे, कोकण, विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावलेली यला मिळत आहे. तर आता हवामान विभागाने देखील पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर, सातारा, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्यांना वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…