ताज्याघडामोडी

टोमॅटोतून ३० लाख रुपयांची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याला अज्ञातांनी संपवलं; हत्येचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले

आंध्र प्रदेशमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये अन्नामय्या जिल्ह्यात एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला लुटण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची हत्या मंगळवारी रात्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी केला आहे. शेतकरी नरेम हा गावात दूध द्यायला जात होता, त्यावेळी नरेम यांना हल्लेखोरांनी रोखलं. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली.

६२ वर्षीय नरेश हे एक किलोमीटर लांब असलेल्या नातेवाईकांना दूध द्यायला निघाले होते. नरेम यांच्या पत्नीने सांगितलं की, काही अज्ञात व्यक्ती टोमॅटो खरेदी करण्यासाठी आल्याचे शेतकरी नरेम यांची हत्या केली.दरम्यान, शेतकरी नरेम यांनी काही दिवसांपूर्वीच शेतातील टोमॅटो विकून ३० लाख रुपये कमाविले होते. हत्येचं कारण देखील याच्याशी संबंधित असू शकतं, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी केशप्पा यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी चार पथक गठीत केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तीन ते चार जणांनी शेतकरी नरेम यांची हत्या केली आहे. तसेच पोलिसांनी शेतकरी नरेम यांच्या कुटुबीयांशी देखील वार्ता केली आहे. शेतकरी नरेम यांचे पत्नी आणि दोन मुली असं कुटुंबं होतं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

7 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago