लातूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाला नियोजित कट करून घरी बोलावून त्याच्या डोळ्यात, अंगावर मिरची पावडर टाकून अमानूष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. औसा तालुक्यातील भादा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. बळीराम नेताजी मगर (वय २५) असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.
३ जून रोजी भादा येथील आनंदनगर चौकात थांबलेल्या बळीरामला गावातीलच निखिल व्यंकट फरताळे याने “तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे”, असं सांगून आपल्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यावर निखिलच्या मामासह आई, आजी, आजोबा आणि इतर नातेवाईकांनी संगणमत करून बळीरामला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
बळीरामच्या डोळ्यात, नाका-तोंडात तसेच अंगावर मिरची पावडर टाकली. या अमानुष बेदम मारहाणीने बळीराम बेशुद्ध होऊन पडला. ही घटना माहित होताच बळीरामच्या नातेवाईकांनी त्याला बेशुद्धावस्थेत लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १५ दिवस मरणाशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर थांबली अन् त्याचा उपचारादरम्यान काल शनिवारी मृत्यू झाला.
दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर मारहाणीचा व्हिडिओ सात दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला. भादा पोलिसांनी बळीरामच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तक्रार दाखल करून घेत एका महिलेसह सात जणांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे करत आहेत.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…