ताज्याघडामोडी

भरधाव टिप्पर आला अन्… ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले; घातपात की अपघात? तपास सुरू

धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला आहे. ओमराजे हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी टिप्परचालकाला ताब्यात घेतलं असून हा अपघात की घातपात? याची चौकशी पोलीस करीत आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर हे नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते.त्याचवेळी अचानक भरधाव वेगात एक टिप्पर आला. हा टिप्पर अंगावर येत असल्याचं पाहून ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारली. त्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले आहे. घटनेनंतर पोलिसांनी भरधाव टिप्परचा पाठलाग करत चालकाला ताब्यात घेतलं.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचं टिप्पर चालकाने पोलिसांना सांगितलं आहे. दरम्यान, मी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया या अपघातानंतर ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. घडलेला प्रकार हा अपघात आहे की घातपात? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago