ताज्याघडामोडी

लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय

लग्नानंतर अवघ्या २० दिवसात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्यास परवानगी दिली. महिलेची आपल्याशी बळजबरीने लगीनगाठ बांधण्यात आलीये, तिचे दुसऱ्याच पुरुषावर प्रेम आहे, याची जाणीव होताच पतीने हे पाऊल उचलले. झारखंडमधील पालमू जिल्ह्यातील बिचकिला गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ही घटना वाचून अनेकांना ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाची आठवण झाली

मनतू पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिचकिला गावातील रहिवासी सनोज कुमार सिंग याचा विवाह 10 मे रोजी प्रियंका कुमारीसोबत झाला होता. लग्नानंतर प्रियंका खुश नसल्याचं सनोजला जाणवू लागलं. आपल्याच गावात राहणाऱ्या जितेंद्र नामक तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते, असं समोजला समजलं.

सध्या आसपासच्या घटना पाहता, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागल्यास, पती स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करुन घेत असल्याचे पाहायला मिळते, किंवा पत्नी अथवा तिच्या प्रियकराचे प्राण घेत असल्याची उदाहरणं वाचायला मिळतात. मात्र सनोजने कुणाच्याही जीवाशी किंवा आयुष्याशी खेळ न करण्याचा निर्णय घेतला.प्रियंका आणि जितेंद्र गेल्या दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वेगळ्या जातीचा असल्याच्या कारणावरुन दोघांच्या लग्नाना कुटुंबीयांनी विरोध केला होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

13 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago