ताज्याघडामोडी

सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला अखेरचा, ड्युटीवर रुजू होण्याआधीच पोलिसाने आयुष्य संपवलं

शहरातील मसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवराम भाऊराव निकम (वय ५७ वर्ष, रा. म्हसरुळ, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेला सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

निकम हे आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते. कर्तव्यावर हजर होण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार आणि पोलीस दल यांच्यावर शोककळा पसरली आहे.

निकम यांनी पोलिस आयुक्तालयातील पंचवटी, सरकारवाडा, शहर वाहतूक तसेच विशेष शाखेत सेवा बजावली होती. काही महिन्यांपासून ते नाशिक शहरातील म्हसरुळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. निकम हे अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे होते.

या प्रकरणी म्हसरुळ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवराम निकम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. निकम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिस तपासात आजारपणामुळे निकम यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

1 day ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago