ताज्याघडामोडी

महाराष्ट्र शासनाची गाळमुक्त धरण व गाळायुक्त शिवार योजना पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभावीपणे राबविणार – आ. समाधान आवताडे

राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या पाझर तलावा साठवण तलाव यामधील गाळ काढून तो शेतामध्ये वापरणे ही महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाने हाती घेतली असून या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेत शिवार सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. तरी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग घेऊन ही योजना प्रभावीपणे राबवावी असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन प्रमाणित मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत असणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना मंगळवेढा तालुक्याच्या विविध गावातील जलसाठ्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याचे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व संपूर्ण देशामध्ये आदर्शवत आणि प्रेरक ठरलेल्या जलयुक्त शिवार या योजनेचे पुरस्कर्ते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत बैठक घेऊन सदर योजना प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. 

त्यानुसार शासनाच्या या योजनेचा मतदारसंघातील विविध जलसाठ्यांमधील गाळ काढून तो गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध भागांमध्ये शेतीसाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे शेती उत्पादनाच्या मर्यादा अधिक पटीने वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध योजनांचा अनेक मार्गाने अवलंब केला जाणार आहे सदर योजनेसाठी महाराष्ट्र शासन प्रमाणित मृदा व जलसंधारण विभाग यांच्यावतीने करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध पाझर तलाव व साठवण तलाव योजनेसाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील डोणज, घरनिकी, डोणज, मरवडे (मासाळ मळा), नंदूर ( मुलाणी शेत,मासाळ शेत), बोराळे- डोणज रस्ता, सलगर बु.( हिप्परकर वस्ती), हुलजंती, पडोळकरवाडी, लवंगी, मारोळी, भोसे, शिरनांदगी, डोंगरगाव, तळसंगी जुना- नवा तलाव, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, जुनोनी, खुपसंगी, रड्डे, जालिहाळ, पाटखळ, लेंडवे चिंचाळे, सोड्डी, पौट, जंगलगी, खडकी, अकोला, बावची, भाळवणी तसेच पंढरपूर तालुक्यातील कोर्टी, रांझणी, उंबरगाव, गोपाळपूर, शिरढोण असे जलसाठे समाविष्ट केले असून या समाविष्ट गावांव्यतिरिक्त आणखी कोणत्या गावातील शेतकऱ्यांना जलसाठ्यातील गाळ काढून शेतीला वापरावयाचा असल्यास माझ्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहनही आ आवताडे यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

15 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago