बिहारमधील सुपौलमध्ये एका नवविवाहित महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्याच्या हव्यासापोटी महिलेचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंड्यासाठी मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत शांती देवीचे वय अवघे १९ वर्षे होते. मृत विवाहितेचा भाऊ सुरेंद्र शर्मा याने सांगितले की, त्याने आपल्या बहिणीचे हिंदू रितीरिवाजांनुसार मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले होते. तेव्हा त्याच्या वडिलांनी मुलाच्या हातात एक लाख ११ हजारांची भेटवस्तू ठेवल्या होत्या. पण, लग्नाच्या महिनाभरानंतर पती दीपक शर्मा याने दुचाकीची मागणी करण्यास सुरुवात केली. दुचाकी देण्यास नकार दिल्याने त्याने शांतीचा छळ सुरू केला, असा आरोप करण्यात आला आहे.
यादरम्यान, शांती देवीला बेदम मारहाण करून गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह फासावर लटकवला. त्यानंतर मृत विवाहितेच्या पतीने सासरच्या घरी फोन केला आणि शांती देवीने आत्महत्या केल्याचं सांगितलं, असा आरोप आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…