ताज्याघडामोडी

घरात दोन लेकींच्या लग्नाची तयारी सुरु, आई कामानिमित्त बाहेर गेली अन् आक्रित घडलं

घरात दोन पोरींचं लग्न होतं. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मुलींचं लग्न होतंय म्हणून त्यांची आई खूप खूश होती. पण, नियतीला या कुटुंबाचा आनंद बघवला नाही आणि लग्नाच्या ४ दिवसांपूर्वी आईचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

दोन मुलींच्या लग्नाच्या ४ दिवसांपूर्वीच या आईचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. ज्यावेळी ही महिला अपघाताची बळी ठरली, त्यावेळी ती नातेवाईक महिलांसोबत तांदुळ मागायला गेल्या होत्या. या सर्व महिला ऑटो रिक्शामधून प्रवास करत होत्या. तेव्हा अनियंत्रिक ट्रकने त्यांच्या ऑटो रिक्शाला धडक दिली. ट्रकने धडक देताच ऑटो रिक्शा उलटली आणि सर्व महिला जखमी झाल्या. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. जिचा मृत्यू झाला त्या या दोन मुलींची आई होत्या ज्यांचं १० मे रोजी लग्न होतं. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तर चालकाचा शोध सुरु आहे. पण, ट्रक चालकाने ट्रक दरीत टाकून तो फरार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोशाळा शिवपुरी येथील रहिवासी कुशवाह कुटुंबातील सुमारे डझनभर महिला तांदूळ मागण्यासाठी ऑटो रिक्शाने ग्रामपंचायत गोहरी येथे जात होत्या. तेव्हा समोरून येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने ऑटोला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की काही सेकंदात ऑटो रिक्शा उलटली आणि त्यात बसलेल्या सर्व महिला गंभीर जखमी झाल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

17 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago