चार महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर पती-पत्नीच्या नात्याचा भयंकर शेवट झाल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. संसार फुलायला सुरुवातही झाली नाही. मात्र, पतीच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि त्याने क्रूरतेची सगळी मर्यादा पार करत स्वतःच्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ठ श्रीनगर येथील महानंद मधुसूदन सरकार याने त्याची पत्नी खुशी महानंद सरकार वय (१८ वर्ष) ही २९ एप्रिल रोजी परस्पर घरातून निघून गेल्याची तक्रार पोलीस स्टेशन, मुलचेरा येथे दिली होती. त्यानंतर पोलीस शोधमोहीम राबवत असतानाच पती महानंदा सरकार याने १ मे रोजी पोलीस स्टेशन गाठून आपल्या शेतात राहत असलेल्या घराच्या बाजूला विहिरीत पत्नीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना सदर घटनेची माहिती देऊन पोलीस पथकासह तहसीलदार यांचे सक्षम पंचनामा करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदनानंतर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी तपास करण्यासाठी ठाणेदार अशोक भापकर यांनी चार जणांची तयार केली. घटनास्थळावरील परिस्थिती, दुवे व साक्षीदार यांच्या तपासात खुशी महानंद सरकार हिचा पती महानंद यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी पतीला मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…