ताज्याघडामोडी

हॉटेलच्या खोलीत २८ वर्षीय वकिलाचा मृतदेह, जवळच चिठ्ठी सापडली; दार उघडताच सारे हादरले…

हॉटेलच्या खोलीत एका वकिलाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळून एक सुसाईड नोटही सापडली आहे. बिहारच्या दरभंगा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील लहेरियासराई पोलीस स्टेशन हद्दीतील व्हीआयपी रोडवर असलेल्या हॉलिडे इन हॉटेलच्या खोलीतून सापडलेला मृतदेह हा वकील मंजन कुमार झा ऊर्फ मोहन झा (वय-२८) यांचा आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

प्रकरणाची माहिती मिळताच वकिलाचे कुटुंबीय दरभंगा येथे पोहोचले. तेव्हा न्यायदंडाधिकारी आणि कुटुंबीयांसमोरच ती खोली उघडण्यात आली. या वकिलाचा मृतदेह बेडवर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

याप्रकरणी सदर एसडीपीओ अमित कुमार आणि पोलिस स्टेशनचे अध्यक्ष कुमार कीर्ती हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हॉटेलच्या खोलीचा पूर्ण आढावा घेतला. याप्रकरणी एसडीपीओ म्हणाले की, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण सांगता येईल. तसेच, या मृतदेहाच्या बाजूला एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून, त्याचा तपास सुरू आहे. पोलिस याप्रकणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत. माहिती मिळताच दरभंगा येथे पोहोचलेल्या मृत वकिलाचे भाऊ, काका आणि मामा यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

14 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago