ताज्याघडामोडी

मामा, स्वप्नीलने साडी वापरुन… मित्रांनी रडत-रडत सांगितलं; तरुणाने घरातच आयुष्य संपवलेलं

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका २४ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. राहत्या घरात फॅनला साडीने गळफास घेऊन तरुणाने आयुष्याची अखेर केली. ही घटना ३ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली .

याबाबत मयत तरुणाचे मामा रतन सिंग पाटील (राहणार वेंकटेश नगर, शेगाव) यांनी शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. मी घरी असताना माझा भाचा स्वप्नील पाटील याचे दोन मित्र आमच्या घरी आले. ‘मामा, स्वप्नीलची आई, वडील, भाऊ बाहेरगावी गेले असून आम्ही त्याच्या घरी गेलो, तेव्हा दरवाजा उघडताच स्वप्नीलने घरामध्ये फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले’ असे मित्रांनी सांगितल्याचं स्वप्नीलचे मामा म्हणाले. मी स्वप्नीलच्या घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार खरा असल्याचे आढळल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वप्नील हा रोकडिया नगर शेगाव येथील रहिवासी होता. खाजगी वाहन चालक अनिल पाटील यांचा तो मोठा मुलगा आहे. स्वप्नील आई, वडील, लहान भाऊ यांच्यासोबत राहत असून ते बाहेर गावी गेले होते. स्वप्नील अमरावती येथील सुपर हॉस्पिटल येथे जनरेटर ऑपरेटर होता.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

23 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago