ताज्याघडामोडी

गुरुवारी पंढरीत ठाकरे समर्थकांकडून शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन

उपनेते,माजी खासदार,आमदार,जेष्ठ पदाधिकारी उपस्थित रहात मार्गदर्शन करणार  

गुरुवार दि. 2 मार्च पासून सोलापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून शिवगर्जना अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून याचा शुभारंभ गुरुवारी पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे भव्य मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या मेळाव्यात  पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेणार आहेत.
   या मेळाव्यास उपनेते विनोद घोसाळकर,उपनेते विजय कदम,शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी,माजी खासदार सुभाष वानखेडे,माजी आमदार उल्हास पाटील,युवा सेनेचे साईनाथ दुर्गे,कु.सुप्रजा फातर्पेकर,जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ,युवा सेना सोलापूर संपर्क प्रमुख उत्तम आयवळे,माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,कैलास चव्हाण(सांगोला विधानसभा संपर्क प्रमुख) आदी या शिवगर्जना मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.
    तरी पंढरपूर,माळशिरस,सांगोला,माढा,करमाळा तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थक यांनी गुरुवार दिनांक २ मार्च रोजी सकाळी ठीक १० वाजता संत तनपुरे महाराज मठ येथे उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 day ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago