ताज्याघडामोडी

दीर वहिणीकडे रोज करायचा भलतीच मागणी, तिने काटा काढला, गावकऱ्यांनी वहिनीला घातला चपलांचा हार

तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेला चपलांची माळ घालून संपूर्ण परिसरात तिची धिंड काढण्यात आली. याचे कारण ऐकून अनेकांना धक्का बसला. या महिलेने दोन लोकांच्या मदतीने आपल्या दिराची हत्या केली होती. 

आपणच दिराची हत्या केल्याची जाहीर कबुली या महिलेने दिली आहे. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर माझा दीर माझ्याशी शरीरसंबंध ठेवण्याची गळ घालायचा. त्याचे हे वागणे मला सहन झाले नाही आणि म्हणून मी हे टोकाचे पाऊल उचलले, असे या महिलेने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी एका महिलेच्या गळ्यात चपलांची माळ घालून तिची परिसरात धिंड काढण्यात आली, अशी माहिती महबूबाबादच्या दोरनाकल पोलिसांनी दिली. या महिलेनेच तिचा दीर राजू याची हत्या केली असे महिलेच्या सासरकडील मंडळींचे म्हणणे आहे. तर, महिलेने देखील दिराची हत्या आपणच केल्याची कबुली दिली आहे. मात्र, महिलेला चपलांची माळ घालून धिंड काढत असतानाच पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी या महिलेला ताब्यात घेतले.

या महिलेने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, ‘माझ्या पतीचा ६ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर माझा दीर राजू हा माझ्याकडे शारीरिक संबंध ठेवण्यास सांगत असे. मी तुझी देखभाल करेन, म्हणून तू माझी इच्छा पूर्ण कर, असे ते मला म्हणत असे. तो मला दररोज छळायचा. त्याच्या रोजच्या छळाला कंटाळून शेवटीन मी दोन लोकांसोबत एक योजना आखली. त्यानुसार मी राजूची हत्या केली. हत्येनंतर मी राजूचा मृतदेह गावात दफन केला.’

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राजू बेपत्ता असल्याचे सर्वांना कळीत झाले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह दोरनाकल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याचे वृत्त आले. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस या प्रकरणाचा करत होते. दरम्यानच्या काळात आरोपी महिलेच्या सासरकडील मंडळींनी आणि गावकऱ्यांनी या महिलेवर राजूची हत्या केल्याचा संशय जाहीर केला. त्यानंतर तिला चपलांचा हार घालून तिची धिंड काढली होती.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago