ताज्याघडामोडी

रात्री जेवण करून बाहेर पडला अन् सकाळी मृतदेहच सापडला; तरुणासोबत नेमकं काय घडलं…

जळगावमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. इथे जेवण करून घराबाहेर पडलेल्या मुलाची सकाळी थेट मृत्यूची माहिती आल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रमेश भास्कर नाडे (वय ३०) रा. राजीव गांधी नगर असे मयत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या रमेश या तरुणाचा सोमवारी सकाळी मृतदेह सापडला. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. राजीव गांधी नगरात रमेश भास्कर नाडे हा तरुण आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह भागवित होता.

रविवारी सायंकाळी ७ वाजता रमेश जेवण करून घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याचे नातेवाईक यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आला नाही. सोमवारी सकाळी ८ वाजता जळगाव शहरातील खंडेराव नगरातील रेल्वे पूलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला.

या ठिकाणी पोलिसांनी मयताची ओळख पटविली असता, तो रमेश असल्याचे समोर आले. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे खाली झोकून रमेश याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे हरीश डोईफोडे करीत आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago