ताज्याघडामोडी

मोबाईलमध्ये ‘हे’ 12 अ‍ॅप असतील तर सावधान! कोणतरी ठेवतंय तुमच्यावर नजर

अँड्रॉइड स्मार्टफोन यूझर्सला काही अ‍ॅप्स फोनमध्ये न ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय.हे अ‍ॅप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. डॉ. वेबच्या सायबर सिक्युरिटी टीमच्या रिपोर्टनुसार, गुगलने प्ले स्टोअरवरून 12 अ‍ॅप काढून टाकलेय. हे अ‍ॅप यूझर्सला अनलिमिटेड जाहिराती पाहण्यास भाग पाडायचे. तसेच या बहाण्याने यूझर्सची माहिती चोरत होते. सायबर सुरक्षेनुसार, यापैकी काही अ‍ॅप्स असे देखील होते की ते खूप लोकप्रिय देखील होते. त्याला 5 मिलियनहून अधिक यूझर्सने डाउनलोड केले होते. 

Dr.Web ने मिळवलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये अँड्रॉइडवर अ‍ॅडवेअर ट्रोजन आणि स्पायवेअर अ‍ॅक्टिव्हिटी झपाट्याने वाढत होती. याशिवाय गुगल प्लेवर आणखी काही धमक्याही दिसत होत्या. काही बनावट अ‍ॅप्स आणि ट्रोजन देखील होते जे यूझर्सला व्हिक्टिम बनवून पेड सर्व्हिस घेण्यास भाग पाडत होते. 

तीनपैकी दोन अ‍ॅप्स असे होते की, ते यूझर्सला दररोज वॉक आणि एक्सरसाइज रिवॉर्ड पॉइंट द्यायचे. यानंतर, यूझर्सने त्यांचे पॉइंट्स रिडीम करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्यांना खूप जाहिराती पाहण्यास भाग पाडले जात होते. गुगलने असे दोन अ‍ॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. एक अजुनही Google Play Store वर आहे. जर तुम्ही असे अ‍ॅप डाउनलोड केले असेल, तर गुगल अ‍ॅपवरून काढून टाकल्यानंतरही ते तुमच्या स्मार्ट फोनमध्येच दिसेल. तसे असल्यास, तत्काळ ते अ‍ॅप्स हटवा. गुगलने सध्या हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. 

ही आहे अ‍ॅप्सची यादी

-Golden Hunt -Reflector -Fitstar -Seven Golden Wolf BlackJack -Unlimited Score -Big Decisions -Jewel Sea -Lux Fruits Game -Lucky Clover -King Blitz

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago