ताज्याघडामोडी

प्रेयसी फोन उचलत नाही म्हणून प्रियकर तापला, रस्त्यात गाठलं अन् विषारी औषध पाजलं

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे विषारी औषध पाजून १९ वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही या गोष्टीचा राग मनात धरून २२ वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं. इतकंच नाही तर त्याने स्वत: देखील विषारी औषध घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोघांनाही उपचारांसाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमन निखार (वय २२) असं आरोपीचं नाव आहे. शनिवारी ही घटना घडली होती.

अमनने तरुणीला भेटण्यासाठी बोलावलं होतं. परंतु, ती सातत्याने नकार देत होती. त्यातच ती मागील आठवड्यात काही कामानिमित्त मैत्रिणीसोबत घराच्या बाहेर पडली. तरूणी कलोडे मंगल कार्यालय परिसरात आली असता या आरोपीने तिला वाटेत गाठलं. त्यानंतर तिला जबरदस्तीने आपल्या गाडीवर बसवून निर्जनस्थळी नेलं. माझ्याशी बोलत नाहीस या कारणावरुन आरोपीने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद वाढला आणि रागाच्या भरात त्याने आपल्यासोबत आणलेलं विषारी औषध तिला बळजबरीने पाजलं. दरम्यान, तरुणाने देखील विषारी औषध पीत स्वत:ला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी दिली.

पीडितेची तक्रार आणि वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी माथेफिरु तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हिंगणघाट येथील ज्ञानेश्वर वॉर्डात राहणाऱ्या आरोपी अमन निखार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी तरुण अमन याच्याविरुद्ध कलम ३०७, ३२८, ३०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत.

❤️TITAN EDGE CERAMIC❤️
SLIMMEST CERAMIC WATCH IN THE UNIVERSE
💫💫AVAILABLE ON OFFER💫💫

टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago