असाराम बापू याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सन 2013 मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने ही शिक्षा मंगळवारी (31 जानेवारी) सुनावली. न्यायालाने राखून ठेवलेला निर्णय आज दिला. आसारामच्या एका माजी शिष्याच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात ही शिक्षा ठोठावण्यात आली.
आसाराम बापू आणि इतर सहा जणांविरोधात अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) नोंदविण्यात आला होता. या एफआयआरमध्ये स्वत:ला धर्मगुरु समजणाऱ्या या बापूने 2001 पासून सुरत येथील महिला शिष्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. अखेर ती आश्रमातून पळून जाण्यात यशस्वी झाली. तत्पर्वी ती अहमदाबादजवळील मोटेरा येथील बापूच्या आश्रमात राहत होती.
दरम्यान, सत्र न्यायालयाने याच प्रकरणात आसाराम बापू याची पत्नी लक्ष्मीबेन, त्याची मुलगी आणि इतर चार शिष्यांसह इतर सहा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या सर्वांवर आसाराम करत असलेल्या गुन्ह्यात मदत आणि प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…