गेल्या काही दिवसांमध्ये झारखंडमधील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. विशेषत: प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांमध्ये यश न मिळाल्यानं खून होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
मकर संक्रातींच्या रात्री राजगड जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रियकरानं आपल्या विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. हजारीबागमधील रामगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. अरमान खान उर्फ रॉकी बाबा नावाच्या व्यक्तीनं 14 जानेवारी रोजी विवाहित प्रेयसी ममताचा जीव घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार ममता विवाहित होती आणि तिला तीन वर्षांचा मुलगा आहे. ममता विवाहित असूनही तिचं आणि अरमानचं अफेअर सुरू होतं, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. आरोपी तिला आपल्यासोबत येण्यासाठी दबाव टाकत होता.
घटनेच्या दिवशीही तो तिला घेण्यासाठी आला होता. मात्र, ममतानं त्याच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानं तो तिच्याशी भांडू लागला. त्याने तिला बेदम मारहाण केली. या भीषण घटनेबाबत मृत ममताची बहीण जया हिने आरोपी अरमानविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…