ताज्याघडामोडी

तुम्ही लै माजलाय,निवडणूक होऊद्या एकेकाला खल्लास करतो !

पंढरपुरात माजी नगरसेवकाकडून बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी

प्रताप गंगेकरसह दोघांविरोधात गुन्हा दाखल

पंढरपूर शहरातील अनिल नगर परिसरात सातत्याने भाडणंतंटा होत असल्याच्या घटना घडत असतानाच यामागे राजकीय वर्चस्वाचे कारण असल्याचीही चर्चा सातत्याने होत आली आहे.रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजनेच्या सुमारास पुन्हा येथे गंभीर घटना घडली असून या बाबत  प्रशांत चौरे राहणार अनिल नगर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादी प्रशांत चौरे व विनायक सोनटक्के हे म्हसोबा मंदिर जवळ गप्पा मारत थांबले असता तेथे माजी नगरसेवक प्रताप गंगेकर व सागर लऊळकर हे आले व फिर्यादीस शिवीगाळ करू लागले.फिर्यादीने शिविगाळ करण्याचे कारण विचारले असता तुम्ही लै माजलाय,एवढी निवडणूक होऊ द्या एकेकाला खल्लास करतो अशी धमकी दिली व प्रताप गंगेकर याने लाकडी दांडक्याने तर सागर लऊळकर याने हातातील कड्याने मारहाण केली.मारहाण झाल्याने फिर्यादीच्या नाका तोंडातून रक्त येऊ लागले.
सदर घटनेनंतर फिर्यादी प्रशांत चौरे व विनायक सोनटक्के यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल होत आरोपी प्रताप नारायण गंगेकर व सागर लऊळकर याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.या प्रकरणी आरोपी माजी नगरसेवक प्रताप गंगेकर व सागर लऊळकर यांच्या विरोधात भादंवि ३२३,३२४,३४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago