ताज्याघडामोडी

पंढरपुरात मटका एजंटसह बुकी मालकावर गुन्हा दाखल

३७० रुपये रोख रक्कम जप्त

मागील काही महिन्यापासून पंढरपुरात जगोजागी मटका एजन्ट बिनधास्तपणे खुलेआम मटका जुगाराच्या नावाखाली आकडे घेताना दिसून येत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.अधून मधून अशा मटका एजटांवर पोलीस कारवाई होतानाही दिसून येते.मटका जुगाराच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करताना रंगेहात पकडून गुन्हे दाखल झाल्याचे प्रकार अधून मधून घडत असतात.गुन्हे दाखल झालेले बहुतांश मटका एजन्ट वारंवार याच गुन्ह्यातील आरोपी असल्याचेही दिसून येते.मात्र प्रत्यक्ष बुकी चालकावर कारवाई होणे हि तशी दुर्मिळ घटनाच म्हणावे लागेल.   

गुरुवार दिनांक ५ जानेवारी रोजी पंढरपूर शहर पोलिसांनी भादुले चौक परिसरात एका मटका एजन्ट वर कारवाई करीत त्याच्याकडून ३७० रुपये रोख व मटक्याचे आकडे लिह्ण्यासाठी उपयोगात आणला जाणारा कागद ताब्यात घेतला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी मटका एजंटची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार शाम वाघमारे या बुकी मालकाच्या सांगण्यावरून मटका जुगाराचे आकडे घेतले जात असल्याची माहिती मिळताच बुकी मालक शाम वाघमारे व मटका एजन्ट अनिल वाडेकर यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,   

       

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago