‘नारायण राणेंकडे असलेल्या पीएने या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडे घातले. पंतप्रधान मोदींना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी राणेंना समज दिली.
पीएला आधी हाकला नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेणार, असा इशारा दिला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. कणकवली इथं नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हजर होते. यावेळी राऊत यांनी दिल्लीतील गोष्टीचा मोठा खुलासा केला.
‘मागच्या अधिवेशनामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर दिले होते. या प्रकारानंतर राणे लोकसभेची पायरी चढायचेच विसरले. राणे अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत, अशी खरमरीत टीका शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेवंर केली आहे. ‘मध्यल्या काळात त्यांनी एक पीए ठेवला होता.
पीएची काम ही फक्त पटवापटवीची होती. अनेकांना त्याने गंडा घातला. मोदी साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी, या पीएला आधी हाकलून द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना झापलं होतं, असा खुलासा विनायक राऊत यांनी केला.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…