ताज्याघडामोडी

सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR

सुसाइड नोटमध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे लिहून एकाने आत्महत्या केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे असे गुन्हा दाखल झालेल्या दोन पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या केली आहे. अनिरुद्ध धोंडू शिंदे असे आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शिंदे याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक शहाणे आणि कामगार आघाडी पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली असून दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago