महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. विकृत मानसिकता असलेल्यांकडून अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. एका नराधम बापाने स्वत:च्याच अवघ्या ११ वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला.
ही बाब ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी नराधम बापास अटक केल्याची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, पीडितेची आई आणि लहान बहीण कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात नराधम बाप आणि पीडिता होती.
पीडिता ही स्वयंपाक खोलीत पोहे बनवत असतानाच नराधम बापाने पीडितेला समोरील खोलीत खेचत नेत तिचा विनयभंग (Crime News) करून लैंगिक चाळे केले. पीडितेची आई घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार पीडितेने आईसमोर कथन केला.
आईने याबाबत पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, नराधमाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर संतापलेल्या आईने पीडितेला सोबत घेत थेट सेवाग्राम पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…