नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा सिन्नरजवळील मोहदरी घाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये तीन तरुणी आणि दोन तरुणांचा समावेश असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील गंगापूर रोडवरील कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बाहेरगावी गेला होता. मात्र मोहदरी घाटात त्यांच्या कारचे टायर फुटल्याने त्यांची कार इतर दोन वाहनांवर आदळली. या कारने डिव्हाडर पार करून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या इतर दोन वाहनांना धडक दिली.
अपघातात वाहनांचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने पोलीस प्रशासनाने धाव घेतली असून मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान, काल दुपारी देखील नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे या गावाजवळ बसने धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर २५ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यातच आज पुन्हा सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात झाला आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…