ताज्याघडामोडी

दि.९ व १० डिसेंबर रोजी स्वेरीत आंतरराष्ट्रीय परिषद ‘टेक्नो-सोसायटल २०२२’ चे आयोजन

स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पंढरपूर- राज्यात तंत्रशिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना आणि व्यावसायिक शिक्षणातील स्वतंत्र पंढरपूर पॅटर्न’ अमलात आणत असताना येत्या दि.९ व दि.१० डिसेंबर,२०२२ या दोन दिवशी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये चौथी आंतरराष्ट्रीय परिषद टेक्नो-सोसायटल २०२२’ चे आयोजन करण्यात आले असून याची पूर्ण तयारी झाली आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.

टेक्नो-सोसायटल २०२२ही स्वेरीमध्ये होणारी चौथी आंतरराष्ट्रीय परिषद असून शुक्रवार, दि.९ व शनिवार, दि.१० डिसेंबर या दोन दिवशी ही परिषद होणार आहे. यानिमित्ताने स्वेरीत आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे हे माहिती देत होते. समाजाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापरहा या परिषदेचा मुख्य गाभा असणार आहे. या परिषदेमध्ये पाणी, उर्जा, दळणवळण, हौसिंग आणि निर्जंतुकीकरण यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, मेकॅट्रोनिक्स, मायक्रो-नॅनो टेक्नॉलॉजी, समाजोपयोगी तंत्रज्ञान, रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया, ग्रामीण आणि शेती संबंधित व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी असणारे तंत्रज्ञान, वापरायोग्य परिसर व आरोग्यासंबंधी चे तंत्रज्ञान, दीर्घकाळ टिकणाऱ्या तंत्रज्ञानासंबंधी सर्वंकष दृष्टीकोन, माहिती व तंत्रज्ञानावर आधारित समाजोपयोगी तंत्रज्ञान, प्रयोगशाळा पातळीवरील आधुनिक समाजोपयोगी  तंत्रज्ञान, सेन्सर, प्रतिमा आणि डेटावर आधारित समाजोपयोगी  तंत्रज्ञान, ग्रामीण आणि शेती संदर्भातील रोजगार निर्मिती साठीचे तंत्रज्ञान, समाजोपयोगी उत्पादन आणि नवनिर्मिती प्रक्रिया, ग्रामीण आणि अभियांत्रिकी विकास, ग्रामीण भारतासमोरील आव्हाने या मुद्द्यांवर अधिक भर असणार आहे. यापूर्वी सन २०१६, २०१८ व २०२० या तीन वर्षी टेक्नो-सोसायटलया आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून स्वेरीमध्ये समाजाशी निगडित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाला चालना मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिसंवाद आयोजित केले होते. तिसरी आंतराष्ट्रीय परिषद ही जागतिक कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने झाली. आता होणाऱ्या चौथ्या टेक्नो-सोसायटल २०२२परिषदेसाठी आयआयटी दिल्लीचे माजी संचालक व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. रघुनाथ शेवगावकर हे प्रमुख उदघाटक म्हणून लाभलेले  आहेत. या परिषदेत कि नोट स्पीकरम्हणून परदेशातून अगुस बुधीयोनो (इंडोनेशिया), प्रा.अशोक रानडे (कॅनडा), डॉ. धनंजय तांबे (अमेरिका), बोतीर उस्मानोव्ह (उझबेकिस्तान), प्रा.अमित सिन्हा (अमेरिका), प्रा.अजय मिश्रा (दक्षिण आफ्रिका), प्रा.तीर्थंकर बॅनर्जी (ऑस्ट्रेलिया), डॉ. नेहा बियाणी (अमेरिका), डॉ. डॉली पारीख (अमेरिका), डॉ. वेंकट रेड्डी (दुबई) तर भारतातील विविध राज्यातून जे एम. चंद्रकिशन, डॉ. विजय आठवले, राजाराम देसाई, डॉ. आय. थिरूनऊक्करसू, डॉ. गौरव बरतारया, डॉ. विजयकुमार पाल, डॉ.कॅशफुल्ल ओरा, डॉ. श्रीदेवी वाकुलाबरनम, डॉ. दिलीप वाकुलाबरनम, डॉ. एन.बी.पासलकर, डॉ. पद्माकर केळकर, डॉ. आर बालसुब्रमण्यम, डॉ. व्ही.के. सुरी, डॉ. प्रताप सानप, डॉ. संजय तोष्णीवाल, श्रीनिवास चामर्थ्य, स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे यांच्यासह तज्ञ संशोधक व अभ्यासक सहभागी होणार आहेत. टेक्नो- सोसायटल २०२२चे मुख्य समन्वयक स्वेरीचे  शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी परिषदेविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, ‘कोणत्याही कार्यक्रमाचा लाभ हा समाजाला कशा पद्धतीने होईल हे पहात असताना टेक्नो- सोसायटलया आंतरराष्ट्रीय परिषदेचा फायदा समाजाच्या उद्धारासाठी करायचा यासाठी टेक्नो- सोसायटलया परिषदेची सुरुवात झाली. यंदा होणाऱ्या परिषदेसाठी जवळपास ३०० प्राध्यापक व संशोधकांनी नोंदणी केली असून १२७ संस्थांमधून व ५१ महाविद्यालयांमधून जवळपास ३५० संशोधनपर लेख प्राप्त झाले आहेत. सर्व संशोधनपर लेख हे स्प्रींजर या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जाणार आहेत. टेक्नो- सोसायटल २०१६टेक्नो-सोसायटल २०१८साली स्प्रींजर या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या प्रोसीडींगचे प्रत्येकी १ लाख वाचकांनी डाऊनलोड करून वाचन केले आहे तर २०२०  साली झालेल्या टेक्नो- सोसायटलया तिसऱ्या परिषदेचे प्रोसीडींग डाऊनलोड करून ५० हजार वाचकांनी वाचन केले आहे.सचिव डॉ. रोंगे पुढे बोलताना म्हणाले की, ‘गेल्या महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन (आर.जी.एस.टी.सी.) कडून ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित बहु-संस्थात्मक संशोधन प्रस्तावास सुमारे ३४ कोटी रुपयांचा संशोधन निधी मंजुर करण्यात आला असून या संशोधन प्रस्तावात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट, मुंबई व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर या तीन संस्थांचा समावेश आहे तसेच या संशोधन प्रकल्पामध्ये प्रमुख संशोधकांपैकी एक म्हणून स्वेरीचे  शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार हे आहेत. २०२२ मध्ये केंद्र शासनाच्या निती आयोगाकडून अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी)च्या महाविद्यालयातील स्थापनेसाठी रु.५ कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. मुंबई जवळील तारापूर विभागातील ग्रामस्थांना बी.ए.आर.सी. च्या तंत्रज्ञानाच्या प्रचाराद्वारे सक्षम करण्यासाठी एन.पी.सी.आय.एल., तारापूर कडून सुमारे रु. २ कोटी एवढे अनुदान मंजूर  झाले आहे. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग, सिव्हील इंजिनिअरींग, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरींग, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींग या शाखांना ३० जून २०२३ पर्यंत एन.बी.ए. चे मानांकन मिळालेले आहे तसेच महाविद्यालयास देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले नॅकअर्थात नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिलचे ३.४६ सीजीपीए सह ए प्लसहे मानांकन देखील नुकतेच मिळाले आहे. सदर मानांकन हे पुढील पाच वर्षांपर्यंत लागू असणार आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ए प्लसमानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव महाविद्यालय ठरले आहे. नॅकचे हे मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीमधील शिक्षणाच्या दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या पूर्वी महाविद्यालयाला नॅकचे व एनबीए चे दोनदा मानांकन मिळालेले आहे. नॅकही शैक्षणिक संस्थांना मानांकन देणारी देशातील स्वायत्त संस्था असून नॅकचे मानांकन असणाऱ्या शिक्षण संस्थाना एक वेगळी ओळख प्राप्त होत असते. या मानांकनामुळे विद्यार्थी, पालक, नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या व इतर समाज घटकांना येथील शिक्षणाच्या उच्च दर्जाबाबत खात्री मिळत असते. या मानांकनामुळे महाविद्यालयाला एक उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्याने, महाविद्यालयास विविध संस्थांकडून अधिक संशोधन निधी मिळण्यास मदत होईल. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून स्वेरीमध्ये ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्र‘ (आर.एच.आर.डी.एफ.) ची निर्मिती ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते उदघाटन करून करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून पुढे समाजोपयोगी आणि ग्रामीण उद्योजकता वाढविण्याच्या हेतूने तसेच उपयोगी तंत्रज्ञान ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या माध्यमातून स्वेरीमध्ये उत्तम दर्जाची व हाय स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वेरीचे नूतन अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीने समाजाची नाळ ओळखून तंत्रशिक्षण देत असताना विविध पातळीवर यश मिळवले आहे, याचेच आपण साक्षीदार आहात. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यासाठी अर्न अँड लर्नही स्कीम राबवणारी स्वेरी ही बहुधा एकमेव खासगी शिक्षणसंस्था असून भविष्यात देखील संस्थेकडून समाजाच्या हिताचे उपक्रम राबवले जातील.या पत्रकार परिषदेला संस्थेचे नूतन अध्यक्ष दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे व आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

4 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

4 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago