ताज्याघडामोडी

गोळीबार,सपासप वार करीत सराईत गुंडाची हत्या

पिंपरी चिंचवड हे गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याचे पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. पिंपरी परिसरातील रामनगर चौकात उभ्या असलेल्या सराईत गुन्हेगाराची गोळीबार आणि त्यानंतर त्याच्यावर सपासप वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात हा सराईत जागेवरच ठार झाला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे.

विशाल गायकवाड ( वय २९) असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी संध्याकाळी सराईत गुन्हेगार विशाल गायकवाड हा रामनगर येथील चौकात उभा होता. काही वेळ तो तिथेच असल्याचे समजताच अज्ञात आठ ते नऊ व्यक्तीच्या टोळक्याने तिथे आले. त्यातील एकाने विशालवर गोळीबार केला.त्यातून तो बचावल्यानंतर त्यांनी विशालवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हल्लेखोर घटना स्थळावरून पसार झाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago