सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
करण्यात आला.यावेळी फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस, पॉलिटेक्निकचे
प्राचार्य प्रा. शरद पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर
साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन
झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. भारताची
राज्यघटना २६ नोव्हेंबरला तयार झाली असली तरी ही घटना २६ जानेवारी १९५०
रोजी भारतीय जनतेला अर्पण करण्यात आली.
तसेच याच दिनी मुबंई येथे झालेल्या २६/११ च्या भ्याड दहशतवादी
हल्ल्यामध्ये वीरमरण आलेल्या जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन
करण्यात आले. यावेळी संविधान दिन व मुबंई येथे झालेल्या २६/११ च्या
दहशतवादी हल्ल्या विषयीची विस्तृत माहीती पॉलिटेक्निकचे प्रा.संग्राम
मेटकरी यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन प्रा अमोल मेटकरी व प्रा.मिस
संगिता खंडागळे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप
फार्मसीचे प्रा. अमोल पोरे यांनी केले.या कर्यक्रमासाठी
अभियांत्रिकी,पॉलिटेक्निक व फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व
शिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…