ताज्याघडामोडी

राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला, नव्या चेहऱ्यांना संधी

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणुका लागतात की काय? अशा चर्चांना उधाण आलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्यात सत्तांतर होऊन जवळपास चार महिने होत आले तरी नव्या सरकारचं दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झालेलं नाही. त्यामुळे विरोधकांकडूनही राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता राज्य सरकारनेच याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सर्व 50 आमदार दोन दिवस गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते गुवाहाटीला जाऊन कामाख्यादेवीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात परतल्यावर लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात आता नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज होणाऱ्या आमदारांना महामंडळ देण्याचा शिंदे सरकारचा प्लॅन असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह येत्या 26 नोव्हेंबरला पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गुवाहाटीहून आल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

6 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

5 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago