ताज्याघडामोडी

फॅबटेक पॉलिटेक्निकचा कॅस्पियन पेंट्स अँड केमिकल्स या कंपनी बरोबर सामंजस्य करार

सांगोला (प्रतिनिधी) : बारामती एमआयडीसी मधील अल्पावधीतच पेंट क्षेत्रात आपले विशिष्ट स्थान निर्माण करणाऱ्या कॅस्पियन पेंट्स अँड केमिकल्स बारामती  या नामांकीत कंपनी सोबत  फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजने सामंजस्य करार केल्याची  माहिती संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय आदाटे यांनी दिली.

अशा प्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान शिकण्यास मदत मिळणार आहे. तसेच इंडस्ट्रियल व्हिजिट ,एक्सपर्ट लेक्चर साठी कंपनीकडून सहकार्य मिळणार असून  विद्यार्थ्यांना  औद्योगिक क्षेत्रात झेप घेता यावी यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहन  मिळणार असल्याचे पॉलीटेक्निक चे प्राचार्य प्रा.शरद पवार यांनी सांगितले.

या वेळी  कंपनीचे डायरेक्टर अरुण खारतोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना  मुद्रा लोन व स्टार्टअप योजनेतून नवउद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन केले व  शैक्षणिक प्रगतीसाठी सहका करण्याचे आश्वासन दिले . या सामंजस्य करारावेळी कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे , मेकॅनिकल चे विभाग प्रमुख प्रा . दत्तात्य नरळे , अकॅडेमिक कोऑर्डिनेटर प्रा. तानाजी बुरुंगले व प्रा. श्रीकांत बुरुंगले उपस्थित होते. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

1 month ago