ताज्याघडामोडी

अपहरणकर्त्याने स्वतःच मुलीला मध्यरात्री घरी आणून सोडलं अन् तिथेच गेला आरोपीचा जीव

अमरावतीमधून अपहरण आणि हत्येचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. यात अमरावती जिल्ह्यतील चांदूर रेल्वे येथील अपहरण केलेल्या मुलीला आरोपीने मध्यरात्री परत घरी आणून सोडलं.

मात्र आरोपीचा त्याच परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून खून करण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा अपहरणकर्ता असलेला मुख्य आरोपी नईम खान याचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला आहे. चांदुर रेल्वे पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.

आरोपीला अटक करण्यासाठी नागरिकांनी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही नागरिकांनी केली होती. मात्र, याआधीच हल्ल्यात आरोपीचा मृत्यू झाला.

काही वेळाने आरोपी पुन्हा त्याच परिसरात आला असता त्याच परिसरात अज्ञात हल्लेखोरांकडून त्याचा खून करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. चांदूर रेल्वे शहरातील या घटनेत मुख्य आरोपी नईम खान याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर चांदूर रेल्वेत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आरोपी एका गाडीतून मुलीच्या घरी आले होते. या ठिकाणी त्यांनी कुटुंबातील सदस्यांसमोरच चाकूचा धाक दाखवत मुलीला जबरदस्तीने ओढून गाडीत बसवून घेऊन गेले. यानंतर कुटुंबियांनी चांदूर रेल्वे पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी मुलगी आणि आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली होती.

परंतु एक दिवस उलटून गेल्यावरही मुलगी न सापडल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली. मुलीला परत आणण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज बांधवांनी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला होता. पोलीस दोन दिवसांपासून त्या मुलीचा शोध घेत असताना आरोपीने गुरुवारी रात्री अल्पवयीन मुलीला घरी आणून सोडलं. आरोपी हा परत त्याच परिसरात आला तेव्हा अज्ञात जमावाने त्याचा खून केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

20 hours ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

5 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago