औरंगाबाद जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मामाच्या गावी आलेल्या पहिली इयत्तेत शिकणाऱ्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हा मुलगा आपल्या मामाच्या गावी आला होता. याठिकाणी झोका खेळता खेळता फास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुष्कर सुभाषराव पोटे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील भगूर या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये मामाच्या गावी गेलेल्या पहिल्या वर्गातील लहान मुलाचा झोका खेळता खेळता फाशी लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरामध्ये मळणी यंत्राचे काम सुरू होते. या दरम्यान नागपंचमीला बांधलेल्या झोक्यावर लहान मुलगा खेळत होता.
यादरम्यान झोका खेळता खेळता झोक्याला गोड गोड पिल्या मारल्या आणि उलटी सुट्टी झाली. यावेळी त्याचा हात सटकून दोन्ही दोरीच्या मध्ये डोके गुंतल्याने त्याला फाशी लागली आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. पुष्कर सुभाषराव पोटे असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भगूर या गावामध्ये शोककळा पसरली आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…