ताज्याघडामोडी

अदार पूनावाला यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका; कोरोना लसीचा दुष्परिणाम झाल्याचा दावा

मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूबाबत वडील दिलीप लुनावत यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेतली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूट, बिल गेट्स, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. कोविड लसीच्या दुष्परिणामांमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत दिलीप लुनावत यांनी मुलीच्या मृत्यूबद्दल 1000 कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

बिल गेट्सची बाजू मांडणाऱ्या वकिलाने कोर्टात नोटीस स्वीकारली आहे. याचिकेत फेसबुक, यूट्यूब, गुगल यांसारख्या सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांवर कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. कारण या माध्यमांतून लस पूर्णपणे सुरक्षित आहे लसींचे दुष्परिणाम या बाबतची माहिती दडपतात असा दावा करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि माधव जामदार यांचा असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेतली आहे.

सुप्रीम कोर्टाने लसीप्रकरणी केंद्र सरकारला नोटीसही बजावली आहे. हैदराबाद आणि तामिळनाडूमधील दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. केरळ उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोव्हा साबू आणि इतर लोकांच्या लसीच्या मृत्यूप्रकरणी उत्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले, की ते लसीचे दुष्परिणाम आणि मृत्यू झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहेत. दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका आहे, सुप्रीम कोर्टने केंद्र सरकारला यापूर्वीच नोटीस बजावलेली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहात संपन्न

५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग आणि ५० हून अधिक उत्पादनांची निर्मिती कोर्टी, पंढरपूर | दि.…

12 hours ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago