पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगीक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील बाललैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत बाललैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. यासंदर्भात, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असुन, शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
जून 2022 ते 24 ऑगस्ट 2022 मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिक्षक बाबाजी उमाजी घोडे याला अटक करण्यात आली असून मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, केंद्रप्रमुख कांताराम महादू भोंडवे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत जिल्हा परिषदेला तक्रार प्राप्त झाली होती आणि लगेचच प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीचे अहवाल आल्यानंतर आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…