ताज्याघडामोडी

दारुड्या पोलिसाचा विठाई एसटी बसमध्ये गोंधळ

वाहकास अश्लील शिविगाळ,चालकाने बस नेली पोलीस ठाण्यात

दारुच्या नशेत पोलीस कर्मचाऱ्याने एसटी बसमध्ये गोधळ घालत वाहकास अश्लील शिवीगाळ करीत गोधळ घातला, अमरावती जिल्ह्यात  अमरावती-दर्यापूर मार्गावरील खोलापूरमध्ये विठाई एसटी बसने प्रवास सुरु असताना हा धक्कादायक प्रकार घडला.अक्षय बेलसरे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हा पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होता. दारुच्या नशेत त्याने चालकासोबत वाद घातला यानंतर एसटी चालकाने थेट बस पोलीस ठाण्यात नेली. हा पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत बडबड करत होता. यावेळी त्याने प्रवाशांसोबत वाद घातला. तसेच माझी चेकिंग कोणी करू शकत नसल्याचे म्हणत त्याने शिवीगाळ केली. तसेच चालकाला बस थांबवण्यास त्याने भाग पाडले. त्यानंतर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याला शांत केले. मात्र, तरीसुद्धा त्याने दारुच्या नशेत वाहकाशीही वाद घातला.या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago